• Slide 1
  • Slide 2
  • Slide 3
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतींच्या हिरवळीने नटलेल्या निसर्गाची अप्रतिम उधळण असलेल्या सर्वांगसुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील गणपतीपुळे हे येथील श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले रमणीय ठिकाण गणपतीपुळे येथील श्रींचे वास्तव्य, त्यांचा महिमा, देवस्थानची माहिती, तेथील नित्यक्रम, उत्सव व इतर अनेक उपक्रम यांना आतापर्यंत अनेक भक्तांनी भरभरून साहाय्य केले आहे. येथे येणाऱ्या भक्तांना यासंबंधी परिचय व्हावा या हेतूने हि वेबसाईट प्रकाशित करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. येथे येणाऱ्या भक्तांना श्री गजाननाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे व इथल्या निसर्गरम्य वातावरणात रंगून तन, मन व धनाने समृद्ध होता यावे यासाठी या सृष्टीचा हा तारणहार विघ्नहर्ता गजाननाने सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी, हीच सदिच्छा!
पुढे वाचा View in English

ॐ गं गणपतये नम:

श्री गणेश हि आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती हि प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ॐकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचे सिद्धांत आहे. श्रीगणेश हि देवता ॐकार रूप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकाररुपात आणणारी अनेक मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक! या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्र्चिमेला दृष्टीला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदीराच देखण स्थापत्य! सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे.

News

  • अंगारिका मंदिर दर्शन
    मंगळवार .दि.१०/०१/२३ रोजी मंदिर दर्शन वेळ पहाटे ३.३० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत
मंदिर

श्री गणेश हि आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती हि प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. श्रीगणेश हि देवता ॐकार रूप आहे.

गणपतीपुळे

गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू हि कल्पना फक्त आद्यदेवतेलाच साजेशी आहे.

इतिहास

मुंबई पासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान अति प्राचीन आहे.

उत्सव

भाद्रपदी उत्सव, माघ उत्सव, दसरा, दीपोत्सव, वसंत पूजा, श्रींची पालखी मिरवणूक असे अनेक उत्सव ...

विद्यमान पंचकमेटी

संस्थान श्रीदेव गणपतीपुळे - विद्यमान पंचकमेटी
श्री.विनायक तुकाराम राऊत
सरपंच
श्री.अमित प्रभाकर मेहेंदळे
खजिनदार
श्री.विद्याधर वासुदेव शेंड्ये
सचिव
डॉ.विवेक यशवंत भिडे
पंच
डॉ.श्रीराम विश्वनाथ केळकर
पंच
श्री.निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर
पंच
श्री.श्रीहरी जनार्दन रानडे
पंच