परिसरातील प्रेक्षणीय स्थळे

परिसरातील प्रेक्षणीय स्थळे



  श्री उमा महेश्र्वर मंदिर हेदवी

        हेदवीचा किनारा पर्यटकांच्या विशेष आवडीचा आहे. या स्वच्छ आणि प्रुषणमुक्त किनाऱ्याच्या पायथ्याशी हेदवीच्या उमा महेश्र्वराचे प्रसिद्ध मंदिर उभे आहे. समुद्राच्या पायथ्यालगत असलेल्या डोंगरात वसलेल्या मंदिरांपैकी हे एक देखणे मंदिर! अहिल्याबाइ-होळकरांनी दिलेल्या देणगीतून अठराव्या शतकाच्या अखेरीस हे देवस्थान उभे राहिले. निरव आणि गंभीर शांततेचा वारसा या मंदिराला आहे.

  श्री वेळणेश्र्वर मंदिर

        हेदवी पासून ५ कि.मी. अंतरावर वेळणेश्र्वराचे मंदिर आहे. खऱ्याखुऱ्या कोकणच्या डोंगर कपारीतून आणि रान जाळीतून वळणाचा रस्ता पुन्हा एका वेळणेश्र्वराच्या पायाशी / सागराच्या पायथ्याशी उतरतो. वेळणेश्र्वर गावची विस्तीर्ण पुळण जगभरच्या पर्यटकांना भुरळ पाडील अशी आहे. बाराव्या शतकापासूनचा इतिहास असलेले हे मंदिर चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आले. इतिहास प्रेमींना जुन्या कोकणची अनुभूती देणारा हा परिसर आहे.

  श्रीक्षेत्र परशुराम

        श्रीविष्णूचा सहावा अवतार परशुराम. आपल्या वादग्रस्त व्यक्तित्वामुळे प्रसिद्ध आहे. समुद्र मागे हटवून त्यांनी कोकणचा भूभाग निर्माण वेत्र्ला, अशी आख्यायिका आहे. श्री परशुराम ज्या महेंद्र पर्वतावर स्थायिक झालेते श्री क्षेत्र परशुराम. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळ पेढे गावात परशुराम देवस्थान आहे. या मंदिराच्या बांधकामात पाश्चात्य, मुस्लिम आणि हिंदू या तिन्ही वास्तूशैलींचा अंतर्भाव आहे. आज जगभर विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चित्पावन (कोकणस्थ) ब्राह्मणांचे मुळ स्थान म्हणुनही या ठिकाणाला विशेष महत्व आहे.