१. स्वेच्छेने देणगी: या पोर्टलद्वारे दिलेली सर्व देणगी ही श्री गणपतीपुळे गणपती मंदिर, गणपतीपुळे, रत्नागिरी येथील धार्मिक, धर्मादाय व सामाजिक उपक्रमांसाठी स्वेच्छेने दिलेली देणगी आहे.
२. देणगीचा विनियोग: देणगीचा उपयोग मंदिराची देखभाल, अन्नदान, महाप्रसाद, धार्मिक विधी, उत्सव, धर्मादाय तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठी केला जाईल.
३. देणगीची पावती: देणगीची रक्कम यशस्वीरीत्या जमा झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक देणगी पावती उपलब्ध करून दिली जाईल.
४. माहितीची अचूकता: देणगीदाराने आपले नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता आणि आवश्यक इतर माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
५. नियमांमध्ये बदल: विश्वस्त संस्थेला आवश्यकतेनुसार या नियम व अटींमध्ये बदल किंवा सुधारणा करण्याचा अधिकार राहील.