हे करा, हे करू नका

हे करा, हे करू नका


हे करा

१) आपल्या वाहनाची योग्य तपासणी करून कागदपत्रे जवळ ठेवा.

२) आपल्या जवळील पैशाची योग्य काळजी घ्या.

३) प्रथमोपचार साहित्य जवळ ठेवा.

४) शक्यतो आपला फोटो, नाव, पत्ता, दूरध्वनी क्र, व रक्तगट असलेले ओळखपत्र जवळ ठेवा.

५) कॅरीबॅग्ज, पाण्याच्या बाटल्या, खल्लेल्या पदार्थाचे कागद व अन्य कचरा सार्वजनिक कचराकुंडीत टाकून स्वच्छता राखा.

६) समुद्राच्या पाण्यात उतरण्यापूर्वी भरती - ओहोटीची माहिती घ्या. शक्यतो एकमेकांचे हात धरून उभे रहा.

७) स्थानिकांशी सुसंवाद व परिचय वाढवा.

८) मंदिरात जाताना तिथल्या प्रथांना मान द्या. त्या स्थानिक श्रद्धा असतात. तसेच मंदिरात असलेल्या नियमांचे पालन करा. असे नियम आपल्या सोयीसाठीच केलेले असतात.

९) आडवाटेवरच्या ठिकाणांना मुद्दाम भेट द्या. त्यामुळे त्यांच्या विकासास हातभार लागतो.

१०) लहान मुलांना स्थळाचा इतिहास व माहिती आवर्जून सांगा.

११) ऐतिहासिक ठेव्यांची जपणूक करा.

१२) नैसर्गिक उत्पादनांचा आस्वाद घ्या.

हे करू नका

१) वेगाने वाहन चालवू नका.

२) शक्यतो मोल्यवान दागिने इतर वस्तू प्रवासात बरोबर घेऊ नका.

३) निसर्ग, पर्यावरणाला हानी पोहोचणारे कृत्य करू नका. निसर्ग हि एक देवता आहे. तिचे पावित्र्य राखा.

४) आजकाल सर्वत्र मिनरल वॅाटरच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या व गुटख्याच्या पुड्या आढळतात. असे वर्तन करु नका. तसेच इतरांनाही तसे करण्यापासून थांबवा. कोणताही कचरा करू नका.

५) समुद्र्स्नानाचे वेळी अवास्तव धाडस करू नका.

६) स्थानिक रहिवाश्यांना त्रास होईल असे वर्तन करू नका. अडचणीच्या वेळी तेच आपल्या मदतीला धावून येतात.

७) मोठमोठ्याने ओरडणे, उगाच हॉर्न वाजवणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

८) प्राचीन मंदिरे, अवशेषांवर आपल्या नावाची मोहर उमटवू नका.

९) मोकळ वागण्यासाठी, स्वातंत्र्य उपभोगायला आपण सहलीला येतो, पण त्या वेळी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे. आपली सभ्य संस्कृती विसरू नये.

१०) कोणाच्याही प्रोत्साहानाखातर अवघड धाडस करून आपल्या बरोबर आलेल्या मंडळींच्या आनंदावर विरजण घालू नका.