परिसरातील प्रेक्षणीय स्थळे 
                        
                        
                            
                              रत्नदुर्ग किल्ला 
                            
                                
                                
                                
                                        रत्नदुर्ग, रत्नगड किंवा भगवती किल्ला या नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार 
                                कारकिर्दीत गोव्याचा राजा विहय मार्क देव यांचा मुलगा भोजदेव (राजा भोज) याने इ.स. १२०५ मध्ये बांधला अशी माहिती मिळते. 
                                दक्षिण कोकणात शिलाहार राजांची राजवट इ.स. ८०० ते १२६० पर्यंत होती. खरं तर फक्त या किल्ल्याचे नाव रत्नागिरी 
                                किंवा पेठ किल्ले रत्नागिरी. घोड्याला नालासारखा आकार असलेला १२० एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुमारे १३०० मीटर लांब व १००० 
                                मीटर रुंद आहे. राजा भोज याने हा किल्ला बांधला असला तरी काही जणांच्या मते त्याही पुर्वी तो अस्तित्वात होता व भोजराजाने त्याची 
                                पुनर्बांधणी वेत्र्ली. नंतर आदीलशाहीच्या ताब्यातून हा किल्ला १६७० मध्ये छ.शिवाजी महाराजांनी जिंकुन घेतला. 
                                १७६१ मध्ये पानिपत युद्धानंतर साशिवराव भाऊंचा तोतया निर्माण झाला आणि त्याने हा किल्ला जिंकून घेतला.
                            
                            
  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक 
                            
                                        पतितपावन मंदिराशेजारीच स्वा. सावरकरांचे स्फ्रुर्तिदायी स्मारक उभारण्यात आले आहे. 
                                येथील सभागृहात पर्यटक व विद्यार्थांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे रत्नागिरीतील समाजसुधारक, स्वातंत्रसैनिकांचा जीवनपट आणि 
                                पर्यटनस्थळे यांची माहिती सांगितली जाते, तर पहिल्या मजल्यावर क्रांतीकारांची माहिती व छायाचित्रे असलेली गाथा बलिदानाची ही प्रर्शनी आहे. 
                                १८५७ च्या स्वातंत्रसंग्रामापासून स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा सचित्र परिचय हे या दालनाचं वैशिष्ट्य. 
                                हे सारं पाहताना एका बाजुच्या शोकेसपाशी येताच तोंडातून आश्चयोर्द्गार बाहेर पातात. 
                                त्या शोकेसमध्ये आहेत स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांचा चष्मा, त्यांची काठी, त्यांच्या सतत जवळ असणारा 
                                जंबिया आणि व्यायामाचे मु्गल. प्रत्यक्ष सावरकरांनी वापरलेल्या वस्तू समोर पाहताना सच्चा देशप्रेमीचे भाव उचंबळून आले नाहीत 
                                तर नवलच. ज्या वस्तूंनी इतिहास घडवला, संघर्षाचे साक्षीदार झाल्या, त्या प्रत्यक्ष पाहणे खरोखरच रोमांचित करणारे आहे. 
                                हॅरी पॅाटरच्या काल्पनिक जादुत डकलेल्या पिढीला हे दाखवण्याची जबाबारी सुजाण पालकांची आहे. 
                                हे स्मारक सकाळी १० ते १२ व सायंकाळी ४ ते 6 या वेळात माफक शुल्क भरुन पाहाता येते.
                            
                              सावरकर कोठडी 
                            
                                        रत्नागिरी शहरातील मेनरोडवर जयस्तंभ चौकात उजवीकडे रत्नागिरीतले विशेष कारागृह आहे. 
                                या कारागृहात स्वातंत्र्येवतेच्या निस्मीम उपासकाचे राष्ट्रीय स्मारक आहे. १६/५/१९२१ ते ३/९/१९२३ या दोन वर्षाच्या काळात 
                                स्वातंत्र्यवीर सावरकरांना या ठिकाणी बंदिवान म्हणुन ठेवले होते. बोटीतुन पळुन जाण्याच्या सावरकरांच्या पराक्रमाचा धसका 
                                घेतल्यामुळे तीनही बाजुने समुद्र असल्याने तुलनेने सुरक्षित असलेल्या रत्नागिरीची निवड ब्रिटीशांनी सावरकरांच्या स्थानबध्तेसाठी केली. 
                                येथुन पळुन जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हातखंबा फाटा. 
                                येथेही त्या काळात मोठा बंदोबस्त ठेवला होता. हेही कमी वाटावे म्हणुन भक्कम लाकडी चौकटीत लोखंडी सळ्या लावलेल्या मजबुत 
                                दोराच्या कोठडीत सावरकरांना ठेवून त्यांच्या गळ्यात मणामणाच्या बेड्याही अडकविल्या होत्या. ही कोठडी आता राष्ट्रीय स्मारक म्हणुन 
                                घोषित केली असुन सावरकरांची मोठी तसबीर असलेल्या या कोठडीची देखभाल एखाद्या पवित्र वास्तुप्रमाणे वेत्र्ली जाते. 
                                बाजूच्या छोट्या खोलीत सावरकरांच्या गळ्यात आकविल्या गेलेल्या लोखंडी साखळ्या आणि त्यांना जोडण्यात येणारे अवजड लोहगोळे 
                                पाहायला मिळतात. आजवर वेत्र्वळ! मणामणाच्या बेड्या! हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला असतो, पण प्रत्यक्षात त्या बेड्या पाहताना त्याचा ! 
                                शब्दशः! अर्थ कळतो. इतक्या बंदोबस्तात सावरकरांना ठेवण्याची ब्रिटीशांना गरज वाटत होती यावरुन सावरकरांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष पटते. 
                                स्वातंत्र संग्रामात स्वा. सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांची आपण केवळ कल्पना करु शकतो. या ठिकाणी मस्तक न कळतच झुकते आणी मनात खोलवर ! 
                                स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे ! या ओळी उमटतात.